'इन्स्टा'च्या मालकापेक्षा प्रियाचे 'फॉलोअर्स' जास्त
 महा एमटीबी  21-Feb-2018

 
गेल्या आठवड्यात एका मल्ल्याळम चित्रपटाचा ट्रेलर काय प्रदर्शित होतो, त्यामधील तीस सेकेंडच्या एका सीनमध्ये एक मुलगी एखादे आकर्षक हावभाव काय करते आणि ते पाहून रातोरात ती देशातच नाही तर जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन काय पोहचते. हे खरोखरच काल्पनिक वाटावे असे आहे, पण हे सत्य आहे. प्रिया प्रकाश वारियर असं या युवा अभिनेत्रीचं नाव आहे. आणि जेव्हा पासून प्रियाचं गाणं सोशल मीडियावर प्रसिद्ध झालाय तेव्हा पासून 'इंस्टाग्राम', फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअँप अशा सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती झळकताना दिसत आहे. आता तर तिच्या प्रसिद्धीचा कहर म्हणजे तिनी चक्क 'इन्स्टा'चा मालक असणाऱ्या मार्क झुकेरबर्गलाही मागे टाकले आहे. मार्कचे ४ मिलियन फॉलोअर्स आहेत तर हेच प्रियाचा आजचा आकडा हा ४.५ मिलियनवर जाऊन पोहचला आहे.
 

 
 
एका तीस सेकंदाच्या व्हिडिओमधील हावभावामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीरूपाला आलेली प्रिया ही कदाचित पहिलीच अभिनेत्री असावी. तिच्या खात्यात आत्ता केवळ एकाच चित्रपट आहे, तो देखील प्रदर्शित झाला नाहीये. आणखी एक महत्वाचं म्हणजे २०१७ मध्ये विश्व सुंदरीचा 'किताब पटकविणाऱ्या मानुषी चिल्लरलाही प्रियाने मागे टाकले आहे. मानुषीच्या फॉलोअर्सची संख्या आजमितीला केवळ २.९ मिलियन इतकीच आहे. विशेष म्हणजे मार्क आणि प्रियाने 'इन्स्टा' सुरु केलेल्या कालावधीमध्ये बऱ्याच वर्षांचा फरक आहे. मार्कने 'इन्स्टा'वर पहिली पोस्ट ऑक्टोबर २०१० मध्ये टाकली होती तर प्रियाच्या पहिल्या पोस्टची नोंद ऑक्टोबर २०१६ला असल्याचे दिसून येते. मानुषीने देखील 'इन्स्टा'वर सप्टेंबर २०१६ मध्ये एंट्री घेतली होती.
 

 
 
प्रियाचा हा जलवा पुढील काळात कायम राहील का नाही हे तिचा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. पण तोपर्यंत अशाच प्रकारे तिच्या फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ होत राहिली तर ती आणखी कोणाकोणाला मागे टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.