स्वप्निल पहिल्यांदाच दिसणार खेळाडूच्या भूमिकेत
 महा एमटीबी  20-Feb-2018


 
मराठी चित्रपट सृष्टीत चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असणारा स्वप्निल जोशी आता पहिल्यांदाच खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी प्रियकर, मित्र, मुलगा या भूमिका त्याने बखुबी वठवल्या होत्या पण आता स्वप्निल क्रिकेटरच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. 'मी पण सचिन' या नव्या मराठी चित्रपटाचे पोस्टर आज सकाळी प्रदर्शित झाले असून स्वप्निल जोशी त्यात प्रमुख भूमिकेत असल्याचे दिसून येते.
 
 
 
स्वप्निलने आज त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे पोस्टर प्रदर्शित केले आहे. त्यावर कॅप्शन लिहिताना तो म्हणतोय, '' तुमच्या आमच्या सर्वांनमध्ये एक सचिन आहे, त्यातल्याच एक !'' यावरून असं लक्षात येतंय की, हा चित्रपट सचिन तेंडुलकर वर आधारित असला तरी यातून प्रत्येकात लपलेल्या सचिनला बाहेर काढण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न असावा. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयस जाधव प्रथमच दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. याआधी निर्माता किंवा संगीतकार म्हणून त्याची ओळख होती.
'मी पण सचिन' हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रदर्शित होईल अशी आशा आहे. स्वप्निलला या भूमिकेसाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार कारण आजपर्यंत त्याने साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी आहे. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर आणखी गोष्टी उलगडत जातील आणि नेमका अंदाजही येईल की स्वप्निल यामध्ये किती षटकार व चौकार ठोकतोय...