राणी मुखर्जी झोपडपट्टीतील मुलांसोबत नाचते तेव्हा....
 महा एमटीबी  20-Feb-2018
 
 
 
 
 
 
अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या झोपडपट्टीतील मुलांसोबत नाचतांना दिसत आहे. हे खरे असले तरी देखील ती मात्र तिच्या आगामी चित्रपटात झोपडपट्टीतील मुलांसोबत नाचतांना दिसत आहे. राणी मुखर्जी हिचा आगामी चित्रपट ‘हिचकी’चे नुकतेच नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
 
 
आज हे गाणे प्रदर्शित झाले असून ‘ओये हिचकी’ असे या गाण्याचे बोल आहेत. झोपडपट्टीमध्ये जावून तेथील मुलांसोबत मज्जा, मस्ती आणि त्या मुलांना शिक्षण देणे असे काहीसे दृश्य या गाण्यात दाखवण्यात आले आहे.
 
 
 
या चित्रपटात तिची भूमिका काही वेगळीच दाखवण्यात आली आहे. तिला सारखी ‘उचकी’ येण्याची समस्या असते आणि या समस्येमुळे तिला कोणकोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते आणि त्यातून तिची जिद्द शेवटी तिला साथ देते आणि ती समाजकार्य करण्यात सुरुवात करते अशा पद्धतिचे काहीसे दृश्य या गाण्यात तसेच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत. 
 
 
 
राणी मुखर्जी बऱ्याच वर्षांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण करीत आहे. त्यामुळे अशा वेगळ्या रुपात प्रेक्षक तिला किती प्रमाणात पसंत करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. हा चित्रपट २३ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची वाट राणीचे चाहते पाहत आहेत.