आणि भारतीय संघाचा दणदणीत विजय....
 महा एमटीबी  02-Feb-2018

 
भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी सामना जरी गमावला असला, तरी एकदिवसीय सामन्यात मात्र भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने रचलेल्या १८९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून विजय मिळवला.
 
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २७० धावांच्या आव्हानाला ताकदीने पेलत रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र रोहित २० आणि शिखर धवन ३५ धावांवर बाद झाले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने अजिंक्य रहाणेच्या साथीने भारताचा डाव सावरला.
 
 
 
कोहलीने ११२ धावांची खेळी करत आपल्या कारकिर्दीतील ३३ वे शतक झळकावले. तर रहाणेने ७९ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर महेंद्रसिह धोनी आणि पंड्याने संघाला विजय मिळवून दिला.
 
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी २७० धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या शानदार १२० धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान संघाने निर्धारित ५० षटकांत आठ बाद २६९ धावा फटकावल्या.