भुसावळ रेल्वेस्थानकावर सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2018
Total Views |
 
 
 

भुसावळ रेल्वेस्थानकावर सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उद्घाटन


. भुसावळ- येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक वरील महिला प्रतीक्षालयात महिलांच्या मासिक पाळीत आवश्यक वस्त्र सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन व नष्ट करण्यासाठी डिस्पोजल मशीनचे उद्घाटन प्रतिक्षालयातील एका महिला सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते करून एक आदर्श पायंडा टाकण्यात आला.

 
मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या महिला कल्याण समितीच्या माध्यमातून जळगाव येथील निधी इंटरपाईजेसकडून हे मशीन घेण्यात आले आहे.या मशीनमध्ये पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर महिलांना मासिक पाळीसाठी आवश्यक सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहे.भुसावळ विभागात पहिलीच ही मशीन लावण्यात आली असून लवकरच विविध स्थानकांवर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर के यादव यांनी सांगितले. यावेळी महिला कल्याण समितीच्या अध्यक्षा चित्रा यादव,पदाधिकारी रजनी सिन्हा, प्रीती मिश्रा,दिपा लकवी, लता अय्यर,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा,सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, स्थानक निदेशक जी.आर. अय्यर, स्थानक व्यवस्थापक अार.के.कुठार,राज शिष्टाचार अधिकारी जीवन चौधरी,मुख्य आरोग्य निरीक्षक पी के सोनी,वरिष्ठ अनुभाग अभियंता आर.एन.देशपांडे विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता पंकज कुमार, वाणिज्य निरीक्षक शकील शेख, विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक एच.एस.आलुवालीया, वैशाली विसपुते,सुर्यकांत विसपुते, हेमंत लोहार आदी उपस्थित होते.

 

@@AUTHORINFO_V1@@