त्रिपुरामध्ये आज ५९ जागांसाठी मतदान सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
त्रिपुरा: ईशान्य भारतातील त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ५९ जागांसाठी हे मतदान होत असून आज सकाळी ७ वाजेपासूनच नागरिक मतदानासाठी सज्ज झाले आहेत. २५ लाखांपेक्षा जास्त जनता या निवडणूकीसाठी मतदान करणार आहे. राज्यभरात ३,२१४ मतदान केंद्रावर सध्या मतदान होत आहे.
 
 
 
 
एकूण ३०७ उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत. आज जनता या एकूण ३०७ उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेस एकूण ५९ जागांसाठी निवडणुका लढणार आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अर्थात ‘माकप’ ५७ जागांसाठी निवडणुका लढत आहे.
 
 
 
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा ‘हिरा’ आणि माकपचे ‘माणिक’ यांच्यात यावेळी ‘सरकार स्थापन करण्यासाठी चुरशीचा मुकाबला होत आहे. ईशान्य भारतातील आठपैकी पाच राज्यांत सध्या भाजपाच्या नेतृत्वातील ‘नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स’ म्हणजे ‘नेडा’ची सरकारे आहेत. 
 
 
 
यातील आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपाचे सरकार आहे; तर सिक्कीम आणि नागालॅण्डमध्ये भाजपाच्या मित्रपक्षांचे सरकार आहे. राज्यात भाजपा ५१, तर ‘आयपीएफटी’ नऊ जागांवर लढत आहे. डाव्या आघाडीने सर्व म्हणजे ६० जागांवरही आपले उमेदवार उतरवले आहेत. माकपाच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीत भाकप, आरसीपीआय आणि फॉरवर्ड ब्लॉकचा समावेश आहे. 
 
 
 
दुपारी १२ वाजेपर्यंत त्रिपुरामध्ये २५ टक्के मतदान झाले आहे. मुख्यमंत्री माणिक शंकर यांनी आगरताळा येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरा विधानसभेमध्ये विक्रमी मतदान करण्याचे आव्हान जनतेला केले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@