पीएनबी घोटाळ्यामध्ये कॉंग्रेस नेत्यांचा ही समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |

निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषदेत माहिती




नवी दिल्ली :
सध्या देशभरात गाजत असलेल्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामध्ये नीरव मोदींसह काही कॉंग्रेस नेत्यांचा देखील हात असल्याचा खुलासा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

या घोटाळ्याची खरी सुरुवात ही २०११ पासून सुरु झाली असून रालोआनेच हा घोटाळा सर्वात प्रथम बाहेर काढला होता. नीरव मोदी याच्या डायमंड जेम्स या कंपनीला संपूआच्या कार्यकाळात अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने कर्ज काढून देण्यात आले होते. त्यामुळे नॅशनल स्टॉक एक्सेंज एजेंसीने डायमंड जेम्सवर बंदी घातली होती. परंतु कॉंग्रेस नेत्यांमुळे ही बंदी मागे घेण्यात आली व त्यानंतर  राहुल गांधी हे स्वतः डायमंड जेम्सच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते, अशी माहिती सीतारामन यांनी यावेळी दिली.

तसेच नीरव मोदींच्या मालकीच्या फायर स्टार डायमंड इंटरनॅशनल प्रा.लि.या कंपनीमध्ये अनिता संघवी या भागीदार असल्याचे ही सीतारामन यांनी सांगितले. अनिता संघवी या कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनु संघवी यांच्या पत्नी असून २००२ पासून त्या या कंपनीमध्ये भागीदार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कंपनीला देखील अलाहाबाद बँकमधून १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढून देण्यात आले होते. त्यावेळे बँकेतील काही अधिकाऱ्यांनी याला विरोध केला होता. परंतु बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या कर्जाला तत्काळ मान्यता देण्यात आली होती व या अधिकाऱ्यांना गप्प करण्यात आले होते. कॉंग्रेस नेत्यांच्या वरदहस्तामुळे नीरव मोदींनी आतापर्यंत घोटाळे केला आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने भाजपवर आरोप करण्याअगोदर स्वतःकडे पाहावे व या घोटाळ्यासंबंधी असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे सीतारामन यांनी म्हटले.




 
याच बरोबर या सर्व घटनाचे पुरावे उपलब्ध असून मोदी जरी देशात नसले तरी त्यांच्या कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पीएनबी घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

निर्मलासीतारामन यांची पत्रकार परिषद :

 
 
@@AUTHORINFO_V1@@