नाशिकच्या ‘शिवछत्रपती’ पुरस्कार्थींचा सत्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : कै. के. एन. डी. मंडळ आणि महाराष्ट्र जम्प रोप यांच्या वतीने बुधवारी (दि. १४) सायंकाळी महाराष्ट्र शासनाचा ’शिवछत्रपती’ पुरस्कार प्राप्त केलेल्या नाशिकचे खेळाडू, क्रीडा संघटक आणि क्रीडा मार्गदर्शक अशा १७ पुरस्कार्थींचा सत्कार करण्यात आला.
 
या कार्यक्रमाचे आयोजन नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनजवळील महेश भवन या ठिकाणी करण्यात आले होते. या पुरस्कारार्थींमध्ये प्रज्ञा गद्रे, विदित गुजराथी, दत्तू भोकनळ, श्रद्धा नल्लमवार, अस्मिता दुधारे, शरयू पाटील, श्रेया गावंडे, अक्षय अष्टपुत्रे, संजीवनी जाधव, सचिन गलांडे, संतोष कडाळे (सर्व खेळाडू), अविनाश खैरनार (क्रीडा संघटक), राजू शिंदे, विजयेंद्र सिंग, अंबादास तांबे (सर्व प्रशिक्षक) या सतरा जणांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेचे संचालक तथा विविध क्रीडा प्रकारांना मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे नानासाहेब महाले यांच्या हस्ते आकर्षक स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन या सर्व पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आले.
 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे खजिनदार तथा शिवछत्रपती पुरस्कार्थी अशोक दुधारे, आनंद खरे, अभिषेक जोशी, हर्षद महंमद, नितीन हिंगमिरे, मकरंद देव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
यावेळी नाना महाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या नाशिकच्या खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षक यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित करण्याचे ठरविले आहे. अशा नाशिककरांना के. एन. डी. संस्थेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे, ही अभिमानाचाही बाब आहे, असे सांगून सर्व शिवछत्रपती पुरस्कार्थींना शुभेच्छा दिल्या. या वेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. हितेंद्र महाजन, अविनाश खैरनार आणि अंबादास तांबे यांनी आमच्या खेळातील कार्यामध्ये इतर सर्व क्रीडा संघटकांचे नेहमीच सहकार्य मिळत आहे, असे नमूद करून आयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि पुरस्कार्थीची माहिती आनंद खरे यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@