निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना चाप बसणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |

कामाचा दर्जा सुधारणार
संदीप पटेल यांच्या सूचनेला सभागृहाची मंजुरी

 
 
मुंबई : कमी दरात कंत्राट मिळवून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना चाप बसणार आहे. मुंबई महानगरपालिकेने कामासाठी निविदा मागितल्यानंतर लघुत्तम दर देणाऱ्या कंत्राटदारास काम दिले जाते. परंतु कंत्राटदार ५० टक्क्याहून अधिक कमी लघुत्तम दर ठेवतात मात्र निकृष्ट दर्जाची कामे करतात म्हणून अशा कंत्राटदाराची कामे दक्षता पथकाव्दारे तपासली जावीत अशी मागणी नगरसेवक संदीप पटेल यांनी ठरावाच्या सूचनेव्दारे केली होती. त्यांच्या सूचनेला सभागृहाची मंजुरी मिळाली असून हा प्रस्ताव आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येईल त्यांच्या सकारात्मक अभिप्रायानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
पालिकेच्या करदात्याकडून मिळणाऱ्या महसुलात विकासकामावर केला जाणारा खर्च वाया जाण्याची शक्यता असते. तसेच निकृष्ट कामामुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवालाही धोका असतो. ज्याप्रमाणे पालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या कामांवर सर्वसाधारणपणे दक्षता पथकाव्दारे पाहणी करण्यात येते. त्याप्रमाणे ज्या कंत्राटदारांनी ५० टक्के किंवा त्याहून कमी दराने कंत्राटे मिळविली आहेत. अशा कंत्राटदारांच्या प्रत्येक कामावर दक्षता पथकांच्या भीतीने कामे पूर्ण व गुणवत्तापूर्वक तपासण्यात यावीत. त्यामुळे कंत्राटदार दक्षता पथकाच्या भीतीने कंत्राटदार गुणवत्तापूर्वक कामे करतील, असे संदीप पटेल यांनी म्हटले होते.
 
पारदर्शकता वाढेल - 
कमी दराच्या कंत्रातबाबतचा प्रस्ताव मंजुर झाल्यामुळे पारदर्शकता वाढेल. लघुत्तम दराने कंत्राटदार निविदा भरणार नाहीत. त्यामुळे कामाचा दर्जा सुधारेल आणि मुंबईकरांनी भरलेल्या कराचा योग्य वापर होईल
संदीप पटेल, नगरसेवक वार्ड क्र. ५८
 
@@AUTHORINFO_V1@@