मंत्रालयासमोर वृद्ध महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |
 

 
मुंबई : मंत्रालयासमोर शुक्रवारी आणखी एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. शकुबाई झाल्टे असे या महिलेचे नाव असून त्यांना त्वरित सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
शकुबाई या नाशिक जिल्ह्यातील चांदवडमधील वडगाव पंगू गावात वास्तव्यास आहेत. दरम्यान, कुटुंबात सुरू असलेला जमिनीचा वाद थांबावा यासाठी त्या मंत्रालयाच्या फे-या मारत होत्या. मात्र, अनेक पत्रव्यवहार केल्यानंतरही काम न झाल्याने त्यांनी मंत्रालयासमोरील परिसतात सायंकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवेळी त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगाही उपस्थित होता.
 
दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करत असून त्यांनी कफ सिरप प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. शकुबाई यांच्या सास-यांची जमिन असून गेल्या ७० वर्षांपासून त्यांचा त्यांच्या चुलत्यांशी वाद सुरू आहे. मधल्या कालावधीत हा वाद सरकार दरबारी गेल्यानंतर प्रांताधिका-यांनी शकुबाई यांच्या बाजुने निकाल दिला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी उपजिल्हाधिका-यांकडे या निर्णयाविरोधात आव्हान दिले. त्यानंतर प्रांताधिका-यांच्या निर्णयालादेखील स्थगिती देण्यात आली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@