शांती आणि सहिष्णूता हा भारत आणि इराणचा मंत्र : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |

भारत इराणमध्ये एकूण १३ करारांवर स्वाक्षरी




नवी दिल्ली : 'भारत आणि इराण यांच्यात हजारो वर्षांचे संबंध असून शांती आणि सहिष्णूता हा दोन्ही देशांचा मंत्र आहे. त्यामुळे भारत आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा नव्याने सुरु झालेल्या या मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा संपूर्ण आशिया खंडाला होईल' असा विश्वास भारताचे पंतप्रधान मोदी यांनी आज व्यक्त केला आहे. नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे इराणचे राष्ट्रपती डॉ.हसन रुहानी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.

तब्बल १० वर्षांच्या अंतरानंतर इराणचे राष्ट्रपती भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या या भेटी दरम्यान भारत आणि इराण यांच्यात एकूण ९ करार (Agreements) आणि ४ सामंजस्य (MoU) करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या अगोदर २०१६ मध्ये भारतीय प्रतिनिधी इराणभेटीसाठी गेले होते व त्यानंतर अवघ्या दोनच वर्षामध्ये दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये वाढत निघालेले हे संबंध अत्यंत सकारात्मक आहेत, असे मोदींनी यावेळी म्हटले.

याचबरोबर दोन्ही देशांचा शेजारी राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानमध्ये शांती आणि स्थैर्य नांदावे, यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. अफगाणिस्तानमधील दहशतवाद संपूर्णपणे नष्ट करून तेथील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणे. तसेच इराणच्या सर्वांगीण विकासासाठी देखील भारत सदैव मदत करेल, असे आश्वासन देखील मोदींनी यावेळी दिले.

इराणचे राष्ट्रपती रुहानी यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याला आपला दुजोरा देत भारत आणि इराण यांच्यातील मैत्रीचा आशिया खंडाला विशेष फायदा होईल, असे म्हटले. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत इराण भारताला करेल, असे त्यांनी म्हटले. तसेच आपली भारत भेट ही आपल्याला अत्यंत समृद्ध करणारी ठरली आहे, असे त्यांनी म्हटले.
 
@@AUTHORINFO_V1@@