पर्रीकरांची प्रकृत्ती स्थिर; मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |



पणजी : गोवाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृत्ती आता स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर योग्य उपचार सुरु असून अनेक तज्ञ मंडळी देखील त्यांच्यासह रुग्णालयात उपस्थित आहेत, असे देखील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या बुधवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे पणजीतील गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु यानंतर काल संध्याकाळी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी योग्य मार्गदर्शक आणि चिकित्सांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थित असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये त्यांना घरी देखील पाठवण्यात येईल व त्यानंतर काही दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या कामाला लागतील, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@