‘बाप रे बाप’! परीचा ट्रेलर प्रदर्शित
 महा एमटीबी  15-Feb-2018
 
 
 
 
 
 
परी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून हा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर पाहिल्यावर तुमच्या मुखातून ‘बाप रे बाप’ हा शब्द आल्याशिवाय राहणार नाही. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने देखील हा ट्रेलर शेअर केला आहे.
 
 
 
भुताच्या वेशात अनुष्का हिला पाहतांना अक्षरशः अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत. या ट्रेलरमध्ये अनुष्का भुताच्या वेशात असून तिला भूतांचा त्रास होत असतो असे काहीसे दाखविण्यात आले आहे. अनुष्काचा रक्तबंबाळ चेहरा आणी हावभाव हे पाहूनच प्रेक्षक पहिले घाबरतो. अनुष्काला भुताच्या वेशात प्रेक्षक किती प्रमाणात आता पसंत करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 
 
 
 
हा चित्रपट २ मार्चला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये बरीच पाहायला मिळत आहे. कारण अनुष्का शर्मा हिने पहिल्यांदाच असा काहीसा अभिनय केला आहे. त्यामुळे तिला भुताच्या वेशात पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.