वाहन उद्योगात विकासक्रांती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018   
Total Views |
 
 
 
विश्वातील वाहनउद्योग आतापर्यंत क्रूड तेलावर अवलंबून होता. तो आता इतर पर्यायी इंधनावर जाणे भाग पडणार आहे. याचे कारण क्रूड तेल इंधन हे शिलाजात प्रकारचे आहे व त्याचा भूगर्भातील साठा केव्हाही संपण्याच्या अवस्थेत जाऊ शकतो. क्रूड तेलाचे भावदेखील जास्त आहेत व त्यापासून बनलेल्या पेट्रोल-डिझेल यांच्या ज्वलनातून वातावरणात कार्बनचे अमाप उत्सर्जन होऊन विषारी प्रदूषण होते.
 
या वाहनक्षेत्रात आता संशोधनातून विकासाची मोठी क्रांती होत आहे व सध्याची देशातील दोन, तीन व चारचाकी एकूण सुमारे ४.६ कोटी वाहने हळूहळू कदाचित विकून टाकावी लागतील आणि भविष्यातील इंधनाच्या अनेक पर्यायांपैकी पहिला पर्याय म्हणजे विजेवर व त्यासंबंधीवर चालणारी वाहने आता बाजारात येऊ लागतील. त्यामुळे नीती आयोगाचे सांगणे आहे की, आपल्या देशात विजेवर चालणार्‍या वाहनांचे पर्याय निवडले तर २०३२ सालापर्यंत वापरण्यात येणारे ८७६ दशलक्ष मेट्रिक टन क्रूड तेलाकरिता विदेशी चलनावर खर्च होणारे ३३० अब्ज (रु. २० लाख कोटी) वाचू शकतील. हे पर्यायी इंधन हरित असल्याने प्रदूषणही कमी होईल.
 
या इलेक्ट्रिक वाहन पर्यायाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. त्या वाहनाची किंमत, बॅटरी बदलणे व बॅटरीची किंमत व बॅटरीचे पुनर्भरण (लहरीसळपस), गाड्यांचे उत्पादन व सुरक्षा, लोकात त्याविषयी जाण निर्माण करणे इत्यादी बाबी मोठ्या आव्हानात्मक ठरतील.
 
विजेवरच्या वाहन वापरामुळे शिलाजात प्रकारचे इंधन मिळण्याचे हळूहळू थांबविले जाणार आहे. विजेवरील वाहनांची मर्यादा २५० ते ३०० किमी. ही बहुतेक वापरणार्‍यांच्या सोईची बनेल. युके व फ्रेंच सरकार पेट्रोल व डिझेलवर चालणारी इंटर्नल कँबशन इंजिनच्या कार बनविण्यावर २०४० पर्यंत कदाचित बंदी आणेल. सध्या बीपी पीएलसी, टेस्ला इत्यादी काही इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनामुळे गॅसोलिनवर चालणार्‍या वाहनांचा वापर कमी होऊन शिलाजात इंधन देणारे दिवसाला एक लाख बॅरल क्रूड तेलाची मागणी कमी झाली आहे व पुढील वर्षी ती १ लक्ष, ५५ हजार बॅरलची मागणी कमी होईल.
 
अनेक उत्पादक कंपन्या मॅग्ना, महिंद्र, पोर्शचे, वॉल्वो, टाटा मोटर्स, टेस्ला, ऍपल, टोयोटा व्हीडब्ल्यू इत्यादी, या इलेक्ट्रिक कार उत्पादन करण्याच्या प्रयत्नात आहेत. भारत सरकारही इलेक्ट्रिक गाड्या येथे वापरात आणण्याकरिता आकर्षक सवलतीचे प्रस्ताव करणार आहे. नागपूरमध्ये इलेक्ट्रिक टॅक्सीचा व मुंबईला इलेक्ट्रिक बसचा प्रस्ताव अमलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या २१ महिन्यात बॅटरीवर चालणार्‍या १७४८ वाहनांचे नोंदणीकरण झाले आहे.
 
पर्यायी उर्जेचे इतर प्रकार
१. पुणे हे हल्ली वाहन उद्योग संशोधनाचे केंद्र बनले आहे व तेथे साखर कारखान्यांच्या रसायनातून व शेतातील विशिष्ट पिकामधून मोलॅसेस, गहू व तांदूळ धान्याच्या काड्यामधून इथेनॉल बनविले जाते. त्यालाच बायोइंधन म्हटले जाते. पुढील ५ वर्षांत या इथेनॉल वा बायो इंधनाला देशात एक लाख कोटी व्यापाराचे मार्केट तयार होईल व २०३० सालापर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याकरिता देशाची गरज १००० लिटर इथेनॉलची असेल. हे असे पर्यायी इंधन वापरातून दिल्ली, मुंबई, बंगळुरू इत्यादी शहरातील प्रदूषण कमी व्हावयाची चिन्हेदेखील जाणवायला लागतील.
 
२. मुंबई ते दिल्ली महामार्गावर एक मार्गिका विजेवर चालणारी करण्यात येणार असून इलेक्ट्रिक केबलच्या साहाय्याने या इलेक्ट्रिक कॉरिडॉरवरून अवजड वाहतूक थेट मुंबईत करणे शक्य होणार आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथे बांधण्यात येणार्‍या नव्या खाडी पुलासह सात विकासकामांचे भूमिपूजन एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र सरकारने लंडन ट्रान्स्पोर्ट कंपनीशी नुकताच सामंजस्य करार केला असून याद्वारे प्रवाशांना इलेक्ट्रिकवरच्या वातानुकूलित दुमजली बसमधून अर्ध्या किमतीत मुंबई-दिल्ली प्रवास करता येणार आहे.
 
३. लॉस एन्जल्सच्या शास्त्रज्ञांनी अशा एका वाहनरचनेचा शोध लावला आहे, ज्यात सौरऊर्जा स्वस्तात वापरता येऊन ती साठवता पण येईल. त्यातून हायड्रोजनचे उत्पादन होऊन ते इंधन म्हणून वापरता येईल. या हायड्रोजन काररचनेत पुष्कळ उपलब्धी असलेले निकेल, लोखंड व कोबाल्ट वापरता येईल व ही ऊर्जा हरित राहील. या हायड्रोजन कारची किंमतही कमी असेल.
 
४. लॉस एन्जल्सच्या शास्त्रज्ञांनी आणखी एक शोध लावला आहे. इलेक्ट्रिक कारकरिता लिथियमबॅटरी लागते. त्यात ऍनोड म्हणून स्वस्तात पडणारे फॉसिलाईज्ड अल्गा डायाटोमवापरता येईल. नेहमीचे ऍनोड सिलिकॉन हे महाग आहे. त्याऐवजी हा डायाटोमपर्यायी पदार्थ स्वस्त पडेल.
 
उडती वाहने
१. मुंबईसारख्या महानगरात वाढत्या वाहनांच्या कोंडीतून सुटका करण्यासाठी अमेरिकेच्या एका व्हिमाना ग्लोबल कंपनीने एअर टॅक्सी सेवा पुरविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या चार आसनी निर्मनुष्य हवाई वाहनातून महागाचा प्रवास असल्यामुळे मुंबई, बंगळुरू व चेन्नईमधील श्रीमंत व्यावसायिक जाऊ शकतील. याच्या काही भागांची निर्मिती पहिल्यांदा ’मेक इन इंडिया’ प्रकल्पातून होण्यामुळे उपादन खर्च कमी राहील.
 
२. फ्रँकफर्टमधील बॅवरिअन कंपनीने ५ आसनी इलेक्ट्रिक कारच्या धर्तीवर फ्लाईंग टॅक्सी बनविली आहे. या वाहनाचा वेग ताशी ३०० किमी. असेल व प्रवासाची मजल ३०० किमी. असेल.
 
३. दुबईमध्ये एक आसनी ड्रोनसारखी होवर टॅक्सी ताशी १०० किमी. प्रवास करेल. अशी ३० मिनिटांची सेवा उपलब्ध होणार आहे. याची बॅटरी अर्ध्या तासात रिचार्ज होईल.
 
४. चीनमधील नानजिंगमध्ये पहिली स्काय ट्रेन बनत आहे. या आधी जर्मनी व जपानमध्ये अशी ट्रेन बनली आहे. यात दोन डबे असणार व २०० पेक्षा जास्त प्रवाशांची सोय होईल. या स्कायट्रेनचा खर्च कमी असेल व त्यात वाहन वर चढविणे व वळविणे सोईने करता येईल. बॅटरी ४ तास चालेल. बॅटरींचा बदल २ मिनिटात वाहनस्थानकांवर थांबेल तेव्हा केला जाईल.
 
५. मुंबईत पाण्यावर उतरणार्‍या समुद्री विमानाचा प्रयोग झाला आहे. ९ डिसेंबर २०१७ रोजी हे विमान मुंबई चौपाटीवर उतरले.
 
६. एमएमआरडीएनी रोप वे वा केबल कारचे विविध प्रस्ताव आणले आहेत.
 
बॅटरीचे पुनर्भरण
हायब्रिड कारच्या लिथियम बॅटरीतला घटक लँथानमया दुर्मीळ मूलद्रव्याची मागणी सध्या सर्वत्र वाढली आहे. ही बॅटरी नेहमीकरिता पुनर्भारित करता येते. लँथानमची मागणी सध्या चीन देश पुरवित आहे. या बॅटर्‍या काही मिनिटात पुनर्भारित करता येतात. काही बॅटर्‍या बटणाच्या आकाराच्या आहेत.
 
मुंबईत इलेक्ट्रिक वा हायब्रिड कार आल्यावर चणचण भासू नये याकरिता टाटा पॉवरतर्फे मुंबईत चार्जिंगची सोय होणार आहे. विक्रोळी येथे पहिले चार्जिंग केंद्र झाले आहे. लोअर परळ, कुर्ला, बोरिवली, वांद्रे-कुर्ला संकुल येथेदेखील चार्जिंगची सोय होणार आहे. भारत सरकार इ-पेमेंटमधून चार्जिंगचे शुल्क भरण्याची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आणणार आहे.
 
वाहनांचे विविध प्रकार
१. स्वीस अभियंता विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक रेसिंग कार बनविली आहे. या बॅटरीवर चालणार्‍या कारला ताशी १०० किमी. वेग यायला फक्त दीड सेकंद पुरते.
२. वेगाच्या वेडातून हायपर लूप वाहनाचा जन्म झाला आहे. वार्‍याच्या वेगाशी स्पर्धा करून ताशी १२०० किमी. वेगाने हे वाहन उपयोगात आणले तर मुंबई-पुण्याचा प्रवास फक्त ३५ मिनिटात होईल.
३. पंक्चर झालेल्या कारच्या ट्यूबची दुरुस्ती आपोआप करण्याची सोय भविष्यात होणार आहे. अमेरिकेतल्या हॉर्वर्ड संशोधकांनी याचा शोध लावला आहे.
४. आता गाड्या लाकडापासून बनविता येतील. त्यामुळे त्यांचे वजन पोलादी गाड्यांचा पाचवा हिस्सा असेल तर त्या पोलादी गाड्यांपेक्षा ५ पट ताकदवान असतील. जपानच्या क्वोटो विद्यापीठात याचा शोध लागला आहे.
५. चीनमध्ये एका मोठ्या बसची निर्मिती झाली आहे. ही बस वाहतुकीचा अडथळा पार करण्याच्या प्रयत्नात रस्त्यातील इतर कारच्या वरून जाऊ शकते.
६. इलेक्ट्रिक वा हायब्रिड कार, बस बनल्यावर कायनेटिक समूहातील कंपनीने विजेवर चालणार्‍या ऑटोरिक्षा बनवायचा प्रस्ताव आणला आहे. तसेच एका मराठी अभियंत्याने स्वदेशी इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणण्याचा घाट घातला आहे.
७. लंडनच्या आयकॉनिक काळ्या रंगाच्या टॅक्सी बदलून नवीन बनविलेल्या टॅक्सी आता इलेक्ट्रिकवर धावणार आहेत.
८. माथाडी कामगारांच्या सामान उचलण्याच्या मदतीला आता छोटे इलेक्ट्रिक इ-ट्राईक वाहन येणार आहे. त्याचे वजन फक्त ५० किग्रॅ. आहे व वेग ताशी ४० किमी.पर्यंत जाऊ शकतो.
 
विजेवरच्या वाहनवापरामुळे शिलाजात प्रकारचे इंधन मिळण्याचे हळूहळू थांबविले जाणार आहे. विजेवरील वाहनांची मर्यादा २५० ते ३०० किमी. ही बहुतेक वापरणार्‍यांच्या सोईची बनेल. युके व फ्रेंच सरकार पेट्रोल व डिझेलवर चालणारी इंटर्नल कँबशन इंजिनच्या कार बनविण्यावर २०४० पर्यंत कदाचित बंदी आणेल.
 
 
- अच्युत राईलकर
 
@@AUTHORINFO_V1@@