पेट्रोलियम क्षेत्रासाठी मोदींचा सौदी अरेबिया दौरा फायद्याचा : धर्मेंद्र प्रधान
 महा एमटीबी  13-Feb-2018
 
 
 
 
 
नवी दिल्ली: गॅस आणि पेट्रोलियम क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौदी अरेबियाचा दौरा अतिशय फायद्याचा ठरणार आहे असे मत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले आहे. आज नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी वरील माहिती दिली.
 
 
 
नरेंद्र मोदी यांचा सौदी अरेबियाचा दौरा अतिशय यशस्वी ठरला असून भविष्यातील तेल, गॅस आणि पेट्रोलियम गुंतवणूकीसाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रात भारताला सौदी अरेबियाचा येत्या काही वर्षांमध्ये चांगला फायदा होणार असून गॅस आणि पेट्रोलियम क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
भविष्यात नरेंद्र मोदी यांचा सौदी अरेबियाचा दौरा फायद्याचा ठरणार आहे. भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध या दौऱ्यामुळे अजून घट्ट झाले असून यामुळे आर्थिक, व्यापार आणि पेट्रोलियम क्षेत्रात याचा चांगला फायदा होणार आहे. तसेच ओमानचा दौरा देखील भारतासाठी महत्वाचा ठरला आहे. ओमान सोबत भारताने आठ करार केले असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.