मौर्य साम्राज्य
 महा एमटीबी  13-Feb-2018

 

 
 
 
 
दुर्दम्य आशावाद, अभूतपूर्व पराक्रम, कुशल राजनीतीच्या बळावर जवळपास संपूर्ण भारतावर शासन करणार्‍या मौर्य साम्राज्याने भारताला केवळ पराक्रमाचा इतिहासच दाखवला नाही तर प्रेम आणि करूणेने सर्व जगाला कसे जिंकता येते याचे प्रत्यक्ष उदाहरण घालून दिले. हा मौर्य साम्राज्य आणि त्याच्या पराक्रमी सम्राटांचा संक्षिप्त पण सुवर्ण इतिहास.
 
 

महाभारत युद्धानंतरचे चौथे साम्राज्य म्हणजे मौर्य अर्थात मगध साम्राज्य होते. चंद्रगुप्त मौर्य हा या साम्राज्याचा संस्थापक होता. भारताच्या इतिहासातले सर्वात मोठे साम्राज्य असा मौर्य साम्राज्याचा लौकिक आहे. .. पूर्व ३२१ ते .. पूर्व १८५ पर्यंत यांचे शासन होते. त्यावेळी मगध साम्राज्यावर नंद वंशाचे शासन होते. बलाढ्य असे हे साम्राज्य त्याच्या शेजारील राज्यांच्या डोळ्यात मात्र सलत होते.जगज्जेता सिकंदर जेव्हा पंजाबवर चढाई करत होता तेव्हा आर्य चाणक्यांनी मगधसम्राट धनानंद याला सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्तेचा माज चढलेल्या धनानंदाने त्यांचा अपमान केला. त्याचवेळी चाणक्यने मगधसम्राटाला धडा शिकविण्याचा तसेच मगध साम्राज्याला योग्य शासक मिळवून देण्याचा पण केला आणि तिथून सुरू झाला मगध सम्राटाचा शोध.

 
 
भारत त्यावेळी विविध गणांमध्ये विभागला गेला होता. त्यात शाक्य, मौर्य या जातीच्या शासकांचा प्रभाव असे. चंद्रगुप्त हा त्यातल्याच एका गणप्रमुखाचा मुलगा होता. एखाद्या योद्ध्याला शोभतील असे सारे गुण त्याच्यात होते. तो साहसी, पराक्रमी तर होताच पण चांगले नेतृत्वही तो करत असे. त्याचे हे गुण चाणक्याने हेरले आणि त्याला आपले शिष्य बनवले. चाणक्य अर्थशास्त्र, राजकारण, कूटनीती यात निपुण होतेच पण चंद्रगुप्ताला युद्धनीती शिकवून त्यांनी स्वतंत्र सैन्य तयार केले आणि बघता बघता नंद वंशाचा शेवटचा सम्राट धनानंद याची सत्ता संपुष्टात आणली. यानंतर चंद्रगुप्त मौर्य मगध सम्राट झाला आणि आर्य चाणक्य त्याचे मुख्यमंत्री झाले. चंद्रगुप्त मौर्य याने ..पूर्व ३२२ मध्ये या साम्राज्याची स्थापना केली आणि पश्चिमेकडे आपल्या साम्राज्याचा वेगाने विस्तार केला. सिकंदरच्या आक्रमणानंतर छोट्या-छोट्या राज्यांमध्ये झालेल्या मतभेदांचा फायदा उठवत ते प्रदेश चंद्रगुप्ताने हस्तगत करून आपले साम्राज्य वाढवले. .. पूर्व ३१६ पर्यंत मौर्य वंशाने पूर्ण उत्तर-पश्चिमभारत आपल्या अंमलाखाली आणला.
 
 
मौर्य वंशाचा चक्रवर्ती सम्राट अशोक याच्या कारकिर्दीत मौर्य वंशाचा प्रचंड विस्तार झाला. मात्र युद्ध आणि त्यातील रक्तपात यातील फोलपणा समजल्यानंतर अशोकाने बुद्धाचा शांतीचा मार्ग अनुसरला. केवळ बौद्धधर्माची दीक्षा घेऊन तो थांबला नाही तर त्याने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हिला श्रीलंकेला बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठवले. तेथील राजा तिसा यानेही बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पश्चिम आशिया, ग्रीस, नैऋत्य आशिया येथेही सम्राट अशोकाने आपले अनेक धर्मप्रसारक पाठवले. मौर्य वंशाच्या महत्त्वपूर्ण शासकांमध्ये चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि सम्राट अशोक यांचा समावेश होतो. चंद्रगुप्त मौर्याने तामिळनाडू आणि वर्तमानकाळातील ओडिशा हे भाग वगळता भारतातील सर्व महाद्वीपांवर शासन केले. चंद्रगुप्ताने सिकंदरचा शक्तीशाली शासक सेल्युकस निकेटरला पराभूत करून त्यानंतरच्या तहानुसार त्याची मुलगी हेलनाशी विवाह केला. त्यामागे सशक्त साम्राज्य निर्माण करणे आणि त्याच्या साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे हा हेतू होता. त्यामुळे भारतीयांना पश्चिमी देशांबरोबर व्यापार करणे सोपे झाले.
 
 
 
भारताला एकसंध केल्यानंतर चंद्रगुप्त आणि चाणक्य यांनी सामाजिक आणि आर्थिक बदल घडवले. त्यामुळे संपन्नता तर आलीच पण पाश्चिमात्त्य व्यापारामुळे देशाचा आंतरिक आणि बाह्य विकास साध्य झाला. मौर्य साम्राज्य प्रांतात विभागलेले होते. अशोकाच्या शिलालेखानुसार या चार प्रांतांची नावे तोसली (पूर्व), उज्जैन (पश्चिम), सुवर्णनगरी (दक्षिण), तक्षशिला (उत्तर) अशी होती. या प्रांतीय प्रशासनाचा प्रमुख राजपुत्र असे. तो राजाचा प्रतिनिधी म्हणून प्रांताचा कारभार पाहत असे. त्याला सहाय्यक म्हणून महाअमात्य मंत्र्यांची समिती असे. अशीच शासनव्यवस्था साम्राज्याच्या स्तरावर असे. केवळ प्रशासनाचा प्रमुख हा सम्राट तर त्याला साहाय्य करण्यासाठी मंत्रिपरिषद असे. मौर्य साम्राज्याचे सैन्य त्याकाळचे सर्वाधिक सैन्य होते. ६ लाख पायदळ, ३० हजार घोडदळ ९ हजार लढाऊ हत्ती या सैन्यात होते. त्याचप्रमाणे अंतर्गत बाह्य माहिती गोळा करणारे हेरगिरी खातेही तैनात होते. सम्राट अशोकाने त्याच्या कालखंडात युद्ध साम्राज्यविस्तारास आळा घातला असला तरी अंतर्गत बाह्य शांततेसाठी आपले सैन्य कायमठेवले होते. चंद्रगुप्ताने भव्य इराणी शहरांशी स्पर्धा करेल, अशी ६४ दरवाजे ५०० मनोरे असलेली मोठी लाकडी भिंत आपली राजधानी पाटलीपुत्रभोवती बांधली होती. मौर्य साम्राज्याच्या एकछत्री अंमलामुळे अंतर्गत लढायांना आळा बसला प्रथमच संपूर्ण भारताची एकत्र आर्थिक व्यवस्था निर्माण झाली. वेगवेगळे कर भरण्याऐवजी ‘अर्थशास्त्रया चाणक्यच्या ग्रंथातील तत्त्वांवर आधारित शिस्तबद्ध उचित अशी कर आकारणी शासनाद्वारे सुरू झाली. मौर्यकालीन अर्थव्यवस्था ही त्यानंतर अनेक शतकांनी उदयास आलेल्या रोमन साम्राज्यासारखी होती. दोन्ही साम्राज्यांचे मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध होते. सहकारी संस्थेसारख्या संस्था होत्या. चंद्रगुप्ताने संपूर्ण भारतात एकच चलन प्रस्थापित केले. शेतकर्यांना, व्यापार्यांना न्याय तसेच सुरक्षा मिळावी याकरिता प्रांतस्तरावर प्रशासक नेमले. गुन्हेगारी टोळ्या, खाजगी, प्रांतिक सैन्य यांना डोके वर काढू दिले नाही. त्यांच्यावर ताबा मिळवला. परिणामी अंतर्गत व्यापार, राजकीय एकात्मता, अंतर्गत सुरक्षा वाढीस लागली. आंतरराष्ट्रीय व्यापारही मौर्य शासनकाळात चमसीमेवर होते. सध्या पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवरील खैबरखिंड ही या व्यापारात अतिशय महत्त्वाची होती. पश्चिम आशियातील ग्रीक राज्ये, मलय द्वीपकल्प भारताबरोबर मोठ्या प्रमाणात व्यापार करीत. भारतातून रेशीम, रेशमी कापड, कपडे, मसाले विविध खाद्यपदार्थ निर्यात होई. युरोपबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण झाल्याने साम्राज्य समृद्ध झाले. मौर्यसम्राट अशोकाच्या कारकिर्दीत हजारो रस्ते, कालवे, जलमार्ग, दवाखाने, धर्मशाळा निर्माण झाले. धान्य कर गोळा करण्यासंबंधीच्या अनेक कठोर कायद्यांच्या शिथिलीकरणाने साम्राज्याची उत्पादनक्षमता वाढली. मौर्यकाळात आरंभी हिंदू धर्म प्रमुख धर्म होता. चंद्रगुप्त मौर्य यानेही आपल्या अखेरच्या काळात जैन धर्म स्वीकारला होता.
 
 
श्रवणबेळगोळ येथे सापडलेल्या शिलालेखानुसार चंद्रगुप्त आपल्या अंतिमटप्प्यात जैन मुनी बनले होते. ते शेवटचे मुकुटधारी जैन मुनी होते. त्यांच्यानंतर कोणीही मुकुटधारी म्हणजे प्रशासक असलेले जैन मुनी झाले नाही. जैन धर्मात चंद्रगुप्ताला विशेष महत्त्व आहे. चंद्रगुप्त स्वामी भद्रबाहू यांच्यासमवेत श्रवणबेळगोळ येथे गेला होता. तेथेच अन्नपाणी वर्ज्य करून, समाधीअवस्थेत त्याने आपले प्राण सोडले. श्रवणबेळगोळ येथे ज्या पर्वतावर त्याचे वास्तव्य होते त्या पर्वताला ‘चंद्रगिरिअसे नाव पडले आणि तेथेच त्याने बनविलेले ‘चंद्रगुप्तबस्तिनावाचे मंदिरही आहे. सम्राट अशोकाचे ४० अभिलेख आतापर्यंत अवगत झाले आहेत. जे प्रामुख्याने ब्राह्मी लिपीत, खरोष्टी आणि ग्रीक भाषेत लिहिले गेले आहेत. सम्राट अशोकाचा बराचसा इतिहास या अभिलेखांतून प्रतीत होतो. इराणचा शासक डेरियस याच्याकडून प्रेरणा घेऊन अशोकाने हे अभिलेख तयार केल्याचे मानले जाते. सम्राट अशोकाने भगवान बुद्धाच्या मानवतावादी संदेशाने प्रभावत होऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याचा जगभर प्रसार केला. त्याच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता. अशोकाने आपला मुलगा महेंद्र मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवून तेथे बौद्ध धर्माचा प्रसार केला. तिसा या तेथील राजानेही बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पश्चिम आशिया, ग्रीस, आग्नेय आशिया येथेही अशोकाने आपले अनेक धर्मप्रसारक पाठवले. त्याने बुद्धाच्या स्मरणार्थ अनेक स्तंभ बांधले, जे आजही त्यांच्या जन्मस्थळी नेपाळमधील लुम्बिनीत मायादेवी मंदिराजवळ, सारनाथ, बोधगया, कुशीनगर तसेच श्रीलंका, थायलंड, चीन या देशांत ‘अशोकस्तंभया स्वरूपात पाहायला मिळतात. सम्राट अशोक आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकही युद्ध हरला नाही. इतका यशस्वी सम्राट असूनही युद्धाने, त्यामधील रक्तपाताने होणारी मनुष्यहानी बघून त्याचे मन हेलावले आणि शांतीचा, करुणेचा संदेश देणारा बौद्ध धर्म त्याला जवळचा वाटला. माणसाला युद्धाने नव्हे तर प्रेमाने जिंकता येते, हे त्याला समजले आणि त्याने बौद्ध धर्म केवळ स्वीकारलाच नाही तर जगभर त्याचे अनुयायी घडवले. अशोकानंतर ५० वर्षे केवळ दुर्बल राजांनी मौर्य साम्राज्य चालवले. बृहद्रथ हा या साम्राज्याचा शेवटचा राजा होता. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, सम्राट अशोक यांनी प्रचंड पराक्रमआणि शिस्तबद्ध रितीने आपल्या साम्राज्याचा जेवढ्या झपाट्याने विस्तार केला, जवळपास संपूर्ण भारत पादाक्रांत केला, त्याच मौर्य साम्राज्याचा निम्म्याहूनही कमी भाग बृहद्रथाच्या साम्राज्यात होता. आपले सर्व साम्राज्य या दुर्बल राजांनी गमावले होते. बृहद्रथाची हत्या .. पूर्व १८५ मध्ये लष्करी संचलनादरम्यान त्याचा मुख्य सेनापती असलेल्या पुष्यमित्र शुंग याने केली. त्याने मौर्य साम्राज्याच्या जागी ‘शुंगसाम्राज्य स्थापित केले. अशाप्रकारे चाणक्याची चाणाक्ष बुद्धी आणि चातुर्य, चंद्रगुप्ताचे अतुलनीय साहस यांच्या अभूतपूर्व संयोगाने निर्माण झालेले, सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसाराने नावलौकीक मिळवून दिलेले मौर्य साम्राज्य दुर्बल प्रशासकांमुळे अस्तंगत झाले.

रश्मी मर्चंडे