भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे ठेवले २७५ धावांचे लक्ष्य
 महा एमटीबी  13-Feb-2018
 
 
 
 
 
 
 
पोर्ट एलिझाबेथ : आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा एकदिवसीय सामना सेंट जॉर्ज पार्क येथे सुरु झाला असून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मैदानावर प्रथम भारतीय खेळाडू फलंदाजीसाठी उरतले असून मैदानावर प्रथम शिखर धवन आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत.
 
 
 
 
चौथा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला असल्याने आजच्या सामन्याकडे भारताचे लक्ष लागले आहे. आजचा सामना भारताने आपल्या खिशात घातला तर भारत ही मालिका आपल्या नावावर करून घेईल. चौथा सामना भारताने जिंकला नसल्याने आजचा सामना भारतासाठी महत्वाचा ठरणार आहे. चौथा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी ‘करो या मरो’ अशा परिस्थितीतला होता.
 
 
 
 
मात्र, त्यांनी जोमाने खेळत चौथा सामना त्यांच्या नावावर करून घेतला. त्यामुळे आता आजचा सामना देखील त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ असाच ठरणार आहे. कारण, भारताने या मालिकेतील तिन्ही सामने जिंकले आहे. त्यामुळे जर भारताला मालिका जिंकू द्यायची नसेल तर आजचा सामना आणि पुढचे दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकेला जिंकावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे हे मोठे शिवधनुष्य असणार आहे.
 
 
 
 
 
भारताने एक सामना जिंकला तरी मालिका आता आपल्या खिश्यात येणार असल्याने दक्षिण आफ्रिका हे सामने फारच आक्रमक खेळणार असे दिसून येत आहे. आता सध्या हाती आलेल्या माहितीनुसार भारत १  बाद  ६५ धावांवर खेळत असून शिखर धवनला ३४ धावांवर बाद करण्यात आले आहे. आता मैदानावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी खेळत आहे.