अनुष्का आणि वरुणचा हा नवीन लुक पाहिला का?
 महा एमटीबी  13-Feb-2018

 
मुंबई :  अनु्ष्का आणि विराटच्या लग्नाची चर्चा आता कुठे विरली असताना अनुष्का आणि वरुण विषयी चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा आगळी वेगळी नसून त्यांचा नवीन चित्रपट 'सुई धागा' याविषयी आहे. सुई धागा या चित्रपटाचा पहिला लुक प्रदर्शित झाला आहे, आणि अनुष्का आणि वरुण धवन विषयी चर्चा रंगली आहे.
 
 
 
 
अनुष्काच्या परी या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर वरुण सोबतच्या या चित्रपटाविषयी सगळ्यांना उत्सुकता होती. यामध्ये अनुष्का एक अत्यंत साध्यामुलीच्या वेषात दिसते आहे. अनुष्का आणि वरुणने आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून हा फर्स्ट लुक सगळ्यांपर्यंत पोहोचवला आहे.
 
 
 
 
अनुष्का ही ‘ममता’ या सामान्य स्त्रीच्या वेशात दिसते. साडी, हातात बांगड्या, कुंकू अशा या वेषात अनुष्का सुंदर दिसते आहे. तर वरुण देखील सर्व सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसून येत आहे.