कोची शिपयार्डमध्ये स्फोट, पाच कर्मचारी ठार
 महा एमटीबी  13-Feb-2018
 
 

 
 
 
 
कोची : कोची येथील शिपयार्डमध्ये आज भीषण स्फोट झाला असून या स्फोटात पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची घटना आज घडली आहे. तसेच या स्फोटात १३ कर्मचारी जखमी देखील झाले आहेत. कोची येथील शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या जहाजावर हा स्फोट झाला आहे.
 
 
जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल केले गेले आहे. ज्या जहाजावर स्फोट झाला त्या जहाजाचे नाव ‘सागर भूषण असे होते. हा स्फोट कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र याचा शोध सध्या घेतला जात आहे. शिपयार्डमध्ये जहाजाची दुरूस्ती करीत असतांना अचानक स्फोट झाला आणि यामुळे जहाजावर एकच अफरातफर सुरु झाली. पाण्याच्या टाकीत हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.
 
 
घटनास्थळी धाव घेत पोलीस आणि बचाव पथकाने बचावकार्य सुरू केले आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून गेवीन आणि रामशाद अशी त्यांची नावे आहेत. आज महाशिवरात्री असल्यामुळे कोची शिपयार्ड बंद होते मात्र, दुरूस्तीच्या कामासाठी काही विभाग सुरु होते. आज शिपयार्ड बंद असल्याने बऱ्याच कर्मचाऱ्यांचा जीव यामुळे वाचला आहे.