नरेंद्र मोदी यांनी सैय्यद असद बिन तारिक यांची घेतली भेट
 महा एमटीबी  12-Feb-2018
 
 
 
 
 
मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओमानचे उपपंतप्रधान सैय्यद असद बिन तारिक अल सईद यांची भेट घेतली आहे. आज मस्कत येथे या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली असून या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. तसेच नरेंद्र मोदी यांनी आज ओमान मंत्रीपरिषदेचे उपपंतप्रधान सईद फहद बिन महमूद अल सैद यांची देखील भेट घेतली.
 
 
 
परस्पर हितसंबंधित क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याची तीव्रता वाढवण्यासंबंधीच्या विषयावर नरेंद्र मोदी आणि सैय्यद असद बिन तारिक अल सईद यांच्यात चर्चा झाली. ओमान देशासोबत चांगले संबंध प्रस्तापित करण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली असून या चर्चेनंतर आता भारत आणि ओमान या दोन्ही देशांचे व्यापारी, आर्थिक संबंध अजून वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. काल ओमान आणि भारत या दोन्ही देशांमध्ये आठ करारांवर स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या. 
 
 
 
आज नरेंद्र मोदी ओमान येथील काही महत्वाच्या ठिकाणांचा दौरा करणार आहेत. आज त्यांनी ओमान येथील शिवमंदिराला भेट दिली असून त्यांनी यावेळी या मंदिरात पूजा केली. तसेच त्यांनी आज मस्कतमध्ये भारत-ओमान व्यापारी परिषदेला संबोधित केले, आणि भारतीय वंशाच्या लोकांशी भेट घेतली.