भारत आणि ओमान यांच्यात आठ करारांवर स्वाक्षऱ्या
 महा एमटीबी  12-Feb-2018
 
 
 
 
 
 
मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबिया देशांच्या दौऱ्यावर गेले असतांना त्यांनी या दौऱ्यात ओमान देशाचा देखील दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे सुलतान काबुज बिमसैद अल्सद यांची मस्कत येथे भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांच्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांमध्ये आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारत हा पहिला देश ज्याने ओमानसोबत तब्बल आठ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहे.
 
 
 
 
 
पर्यटन मदत, कायदेशीर आणि न्यायालयीन कामकाजात मदत, आरोग्य क्षेत्रात मदत, शांततापूर्ण अंतराळाच्या उपयोगासाठी मदत, ‘विजा’ सवलत, राजकीय संस्थानासाठी मदत, सुरक्षा अभ्यास करार, सुरक्षा मदतीत विस्तार अशा प्रकारच्या आठ मुद्यांवर या दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले आहे. भारताने पहिल्यांदाज एखाद्या देशासोबत एवढ्या व्यापक प्रमाणात करार केले आहे.
 
 
 
 
 
या दौऱ्यामुळे दोन्ही देशांचे व्यापारी संबंध अजून मजबूत झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये या आधी वर्ष २०१६-१७ मध्ये ४ बिलीयन डॉलरचा व्यापार होता. मात्र आता दिवसेंदिवस हा व्यापार वाढणार असून यामुळे दोन्ही देशांची प्रगती होण्यास चालना मिळणार आहे. नरेंद्र मोदी यांचा सौदी अरेबियाचा दौरा भारताच्या दृष्टीने अतिशय यशस्वी मानला जात आहे. नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी पहिल्यांदा फिलीस्तान देशाचा दौरा केला आहे. 
 
 
 
या दौऱ्यामुळे भारताचा व्यापार आणि आर्थिक विकास होण्यास मदत मिळणार असून सौदी देशांसोबत भारताचा संबंध अजून घट्ट होण्यास मदत झाली आहे.