रशियामधील विमान दुर्घटनेत ७१ प्रवाशांचा मृत्यू
 महा एमटीबी  12-Feb-2018
 
 
 
 
 
रशिया: रशियामधील मोठे शहर ओर्क्ससाठी उड्डाण घेतलेल्या विमानाचा अपघात झाला असल्याची बातमी नुकतीच मिळाली आहे. या विमान दुर्घटनेत ७१ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. रविवारी दुपारी हे विमान उड्डाणासाठी सज्ज झाले होते. त्यानंतर काही तास उड्डाण केल्यावर अचानक विमान जमिनीच्या दिशेने जावू लागले आणि एका शहराच्या मध्यभागी अपघातग्रस्त झाले.


 
 
 
काल दुपारी उड्डाण केलेले हे विमान दुपारी २.४८ च्या दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. Antonov An-१४८ असे या विमानाचे नाव होते. रामसेस्की जिल्यातील एका मस्जिदजवळ हे विमान पडले आहे. सध्या या विमानातील प्रवाश्यांना बाहेर काढले जात असून बचावतंत्र जोमाने कामाला लागले आहे. या घटनेत ६५ प्रवाशी आणि ६ विमान कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे. 
 
 
 
 
ही घटना कशी घडली याचा अध्याप शोध लागला नसल्याने या घटनेचा तपास घेतला जात आहे. मात्र या घटनेत बऱ्याच प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याने संपूर्ण जगातून या घटनेवर दुख: व्यक्त केले जात आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी देखील या घटनेवर दीर्घ शोक व्यक्त करत या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहे.