अबूधाबीतील पहिल्या स्वामीनारायण मंदिराची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2018
Total Views |

पंतप्रधानांच्याच हस्ते मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण

 

 
 
 
अबूधाबी :  दूबईतील अबूधाबी येथे बांधण्यात येणाऱ्या पहिल्या स्वामीनारायण मंदिराची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. तसेच त्या मंदिराच्या प्रतिकृतीचे आनावरणही मोदी यांनी यावेळी केले.
 
 
पंतप्रधान नरेंद मोदी हे सध्या अरब देशांचे दौऱ्यावर आहेत. यामध्ये पॅलेस्टाईन येथील त्यांचा दौरा संपवून त्यांनी अबूधाबीतील राजाचीही भेट घेतली. यावेळी येथे त्याचे स्वागत करण्यात आले. तसेच संयुक्त राष्ट्राचे उपाध्यक्ष व पंतप्रधान शेख मोहंम्मद यांचीही भेट घेतली यावेळी मंदिर समितीचे सदस्यही उपस्थित होते.
 
 
 
 
 
या भेटीदरम्यान तेथील वार्ताहारांआधी पंतप्रधान मोदी यांनी तेथील राजकुमारांशी चर्चा केली. यामध्ये दोन्ही राष्ट्रांचे संबंध दृढ करण्यासंबंधीत चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी मंदिराचे साहित्यही मंदिर समितीच्या सदस्यांनी पंतप्रधान मोदी आणि राजकुमार यांना सादर केले. हे स्वामी नारायण मंदिर हे दुबई अबुघाबी मार्गावरील एकमेव दगडी बांधकाम असलेले मंदिर ठरणार आहे. 
 
 
यावेळी नरेंद्र मोदी यांनी अबूधाबीच्या राजकुमार यांच्या सोबत रॉयल पॅलेसमध्ये प्रतिनिधी मंडळी स्तरीय चर्चा केली. राजकुमार यांच्याकडून या रॉयल पॅलेसमध्ये आमंत्रण मिळालेले पंतप्रधान मोदी हे पहिले विदेशी नेता ठरले आहेत. युएईच्या एका आधुनिक राष्ट्राच्या विकासामध्ये भारतीय कामगारांच्या भूमिकेची राजकुमार यांनी प्रशंसा केली.
 
 
 
 
शेख मोहंम्मद यांच्या भेटीत व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण व सुरक्षा आणि लोकांमधील एकमकांशी संपर्क यांमध्ये आपले सहकार्य विस्तारण्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
 
 
तसेच नरेंद्र मोदी यांनी युएईच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली दिली. तसेच दुबई ओपेरामधील प्रख्यात दुर्मिळ ओपेरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्साही भारतीय समुदायाला संबोधितही केले. त्याचप्रमाण रे मंदिर म्हणजे युएईची सहिष्णुता आणि सलोखाची बांधिलकी या मंदिराची साक्ष असेल, असेही मोदी म्हणाले. तसेच नवीन भारताचा दृष्टिकोन आणि भारतातील व्यावसायिकांच्या यशोगाथा सांगत गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल आणि देशांतील व्यावसायिकांची व्यवसाय सुलभता विषद केली.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@