नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे यांची घेतली भेट
 महा एमटीबी  10-Feb-2018
 
 
 
 
 
 
अम्मान : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जॉर्डन राजे अब्दुल्ला यांच्याशी भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युएई, ओमान आणि फिलीस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काल अम्मान येथे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची भेट घेतली आहे. नरेंद्र मोदी यांचा २०१४ नंतर अरब देशांमधील हा ५ दौरा आहे.
 
 
 
 
 
या भेटीने राजे अब्दुल्ला यांनी भारत आणि जॉर्डनच्या संबंधांमध्ये एक नवा अध्याय सुरु केला आहे असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच यासाठी नरेंद्र मोदी यांनी राजे अब्दुल्ला यांना धन्यवाद देखील म्हटले आहे. नरेंद्र मोदी आणि राजे अब्दुल्ला यांच्यात यावेळी दोन्ही देशांच्या संस्कृतीविषयी चर्चा झाल्या असून एकमेकांच्या देशांचे त्यांनी यावेळी वर्णन केले.
 
 
 
आज नरेंद्र मोदी फिलीस्तान या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहे. नरेंद्र मोदी यांचा फिलीस्तान देशाचा हा पहिलाच दौरा असणार आहे. फिलीस्तानचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी पश्चिम आशियामधील शांतता प्रक्रियेत भारताची महत्वाची भूमिका आहे असे म्हटले आहे.