हा तर जेटलींचा शेवटचा अर्थसंकल्प ! - पी. चिदंबरम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2018
Total Views |

 
नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री यांनी केंद्र सरकारद्वारे मांडला गेलेल्या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. बरे झाले हा जेटलींचा शेवटचा अर्थसंकल्प आहे, एकूण सगळ्याच आघाडीवर हा अर्थसंकल्प अपयशी ठरला असल्याची टीका चिदंबरम यांनी केली आहे.
 
 
अर्थमंत्री वित्तीय तुटीवर तोडगा काढण्यास असमर्थ ठरले आहेत, सर्वच खर्च हा अर्थसंकल्पापेक्षा अधिक जात असल्याचा दावा चिदंबरम यांनी केला आहे. वस्तू निर्यात करण्यासाठी कुठल्याही विशेष योजना लागू केल्या नाहीत. दावोसमध्ये केलेल्या मोदींच्या भाषणाचा एवढ्या लवकर विसर पडेल असे वाटले नव्हते, असा टोला त्यांनी हाणला आहे.
 
 
शेतकऱ्यांची मिळकत दीडपटीने वाढवण्याची घोषणा तर केली, मात्र त्याची मांडणी पूर्णपणे केलेली नाही. शेतकऱ्याची वाढणारी मिळकत कशाप्रकारे शक्य होईल? याबाबत देखील स्पष्टता देण्यात आलेली नाही. रोजगारासंबंधी पुरेशी स्पष्टता यावेळी देखील नसल्याची तक्रार त्यांनी केली. मुद्रा योजना रोजगारासाठी असल्याचे अर्थमत्र्यांनी सांगितले मात्र यातून किती रोजगार निर्मिती होईल याबाबत कुठलीही स्पष्टता देण्यात आलेली नाही, अशी देखील टीका चिदंबरम यांनी केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@