यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा : जेटली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2018
Total Views |

 
 
 
 
नवी दिल्ली : २०१८ चा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. अर्थसंकल्प सादर केल्यावर नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. यंदाचा अर्थसंकल्प गरीब जनतेच्या हितासाठी असून त्यांच्या उन्नतीसाठी आहे असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत करण्याला जास्त प्राथमिकता दिली आहे. ग्रामीण क्षेत्राचा विकास करणे आणि त्यांचे भविष्य घडविणे यावर यंदाच्या अर्थसंकल्पात जोर दिला आहे असेही ते यावेळी म्हणाले. देशाची आर्थिक प्रगती करायची आहे आणि सामाजिक सुरक्षिततेवर देखील नजर ठेवायची आहे त्यामुळे काही बाबी सोडल्या तर यंदाचा अर्थसंकल्प दर्जेदार मानला जात आहे.
 
 
करांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सगळ्याच क्षेत्रामध्ये सध्या लवकर सूट देता येणार नाही त्यामुळे आता आर्थिक दृष्टीने सरकारला जसे परवडेल तशा पद्धतीने काही वस्तूंमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र सामान्य नागरिकांचा विचार केला तर त्यांच्यासाठी हा अर्थसंकल्प फायद्याचा ठरले. पेट्रोल आणि डीझेलमध्ये सूट देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@