‘बिग बी’ घेणार ट्विटरवरून एक्झिट ?
 महा एमटीबी  01-Feb-2018
 
 

 
 
 
अभिनयाचे शहेनशहा आणि बिग बी अमिताभ बच्चन ट्विटरवरून ‘एक्झिट’ घेण्याच्या विचारात आहेत. याचे संकेत स्वतः बिग बीं यांनी काल रात्री स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरून दिले आहेत. त्यामुळे आता बिग बी यांचे चाहते पुरते नाराज झालेले दिसत आहेत. अमिताभ बच्चन ट्वीटरवरून जाणार असे समजले असताच सोशल मिडीयावर त्याचे ‘मेसेज’ दिसत आहेत.
 
 
 
त्यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये ट्विटरने त्यांचे फॉलोअर्स कमी केल्याचा आरोप केला आहे, अर्थात हे विनोदी शब्दात त्यांनी मांडले आहे. तसेच आतापर्यंत त्यांना फॉलोअर्सकडून मिळालेल्या प्रेमासाठी आभारही व्यक्त केले आहे. यासोबत ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला समुद्राची उपमा देत त्यात आणखीही मासे आहेत जे लोकप्रिय आहेत असा उल्लेखही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला आहे. 
 
 
ट्विटरवर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या दोघांचेही ३२.९ फॉलोअर्स आहेत. तर सलमान खान ३०.९ मिलियन, अमिर खान २२.८ मिलियन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक म्हणजे ३९.९ मिलियन इतके ट्विटर फॉलोअर्स आहेत. यामुळे ट्वीटरची शक्ती किती प्रमाणात आहे हे कळून येते.