अमिताभ यांनी मानले नागपूरकारांचे आभार
महा एमटीबी   09-Dec-2018

 

 
 
 
 
नागपूर : सध्या अभिनेता अमिताभ बच्चन हे नागपूरमध्ये झुंड या सिनेमाची शूटिंग करत आहेत. गेल्या आठवड्यापासून सिनेमाच्या शूटिंगसाठी अमिताभ नागपुरमध्येच आहेत. पुढील काही दिवसही अमिताभ नागपुरमध्ये मुक्कामाला असणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या शहरात येण्यामुळे नागपुरकरांना अतिशय आनंद झाला.
 
 
बिग बी ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत, तेथे त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती. हॉटेलच्या लॉबीमध्ये आणि हॉटेलबाहेर रस्त्यावरही गर्दी जमली होती. चाहत्यांनी केलेल्या या गर्दीचे फोटो अमिताभ यांनी ट्विटरवर शेअर केले. हे फोटो शेअर करताना अमिताभ यांनी नागपूरकरांचे विशेष आभार मानले. “माझ्याविषयीचे चाहत्यांच्या मनात अजूनही प्रेम कायम आहे. रस्त्यावर, हॉटेलच्या लॉबीमध्ये आणि माझ्या मनामध्येही हे प्रेम मला दिसत आहे. नागपूरकर तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमचे आभार मानतो.” असे अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
 
 
 
 

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या सिनेमात अमिताभ बच्चन हे एका निवृत्त क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत. फुटबॉल या खेळावर आधारित हा सिनेमा आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या एका मुलाचे आयुष्य फुटबॉल खेळामुळे कसे सुधारते, याभोवती सिनेमाचे कथानक फिरते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/