शाहिद कपूरला कॅन्सर?
महा एमटीबी   08-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : अभिनेता शाहिद कपूरला कॅन्सर झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला येत होत्या. परंतु आता या सर्व चर्चांना खुद्द शाहिद कपूरच्या कुटुंबियांनीच पूर्णविराम दिला आहे. शाहिदच्या बाबतीतील या सर्व चर्चा खोट्या असल्याचे शाहिदच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे.
 

काही दिवसांपूर्वी एका वेबसाइटने बॉलिवुडमधील एका सुप्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला कॅन्सर झाला असल्याचे वृत्त दिले होते. तेव्हापासून हा डान्सर अभिनेता शाहिद कपूर असून तो उपचारासाठी मुंबई बाहेर आहे. अशी अफवा पसरली होती. परंतु अभिनेता शाहिद कपूरची प्रकृती एकदम ठणठणीत असल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. त्यामुळे हे वृत्त खोटे असल्याचे समोर आले आहे.

 

शाहिदला कॅन्सर झाल्याची बातमी नेमकी आली तरी कुठून? अशा अफवा पसरविण्यात कोणाला काय आनंद मिळतो?” असा सवाल शाहिदच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच शाहिद कपूर कामानिमित्त दिल्लीला गेला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबाने दिली. लवकरच शाहिद मुंबईत परतणार आहे. असेही त्यांनी सांगितले. ‘कबीर सिंग’ हा अभिनेता शाहिद कपूरचा आगामी सिनेमा आहे. ‘कबीर सिंगहा एका तेलुगू सिनेमाचा रिमेक असून शाहिद या सिनेमामध्ये एका मेडिकल स्टुडंटच्या भूमिकेत दिसणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/