भारताला मिळाली १६६ धावांची आघाडी
महा एमटीबी   08-Dec-2018अॅडलेड : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २३५ वर गुंडाळल्यानंतर भारताने सावध सुरुवात केली. मुरली विजय झटपट तंबूत परतल्यानंतर राहुल आणि पुजाऱ्याने भारताचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी ६३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुल ४४ धावांवर बाद झाल्यानंतर पुजाऱ्याने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने ७१ धावांची भागीदारी रचून भारताला तिसऱ्या दिवसअखेर १६६ धावांची आघाडी मिळवून दिली.

 

औस्ट्रेलियाचा पहिला डाव भारताने २३५ धावांमध्ये गुंडाळला. ऑस्ट्रेलियाकडून त्रविस हेडने सर्वाधिक ७२ धाव केल्या. तर भारताकडून अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. शमी आणि इशांत शर्मानेही प्रत्येकी २-२ जणांना तंबूत धाडले. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावामध्ये सावध सुरुवात करून तिसऱ्या दिवसअखेर ३ विकेट गमावून १५१ धावांची मजल मारली. पुजारा सध्या १२७ चेंडूंमध्ये ४० धावाकरून नाबाद आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/