अमिताभ दिसणार 'या' सिनेमाच्या सीक्वेलमध्ये
महा एमटीबी   08-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : २००२ साली ‘आँखे’ या सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या सिनेमाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली होती. लवकरच या सिनेमाचा सीक्वेल येणार आहे. २०१९ मध्ये या सिनेमाच्या सीक्वेलची शूटींग सुरु होईल. आँखे सिनेमाच्या पहिल्या भागात अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. सिनेमाच्या सीक्वेलमध्येही अमिताभ बच्चन झळकणार आहेत.
 

या सिनेमाची कथा तीन अंध व्यक्तींभोवती फिरणारी होती. अनीस बझ्मी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. तरुण अग्रवाल हे सुनील लुल्लांसोबत मिळून या सिनेमाच्या सीक्वेलची निर्मिती करणार आहेत. गौरांग दोषी यांनी २००२ साली आँखे या सिनेमाच्या पहिल्या भागाची निर्मिती केली होती. २०१६ साली ऑगस्ट महिन्यात ‘आँखे’ या सिनेमाची घोषणा केली होती.

 

अमिताभ बच्चन यांच्यासोबत अरशद वारसी, अर्जुन रामपाल आणि एलियाना डिक्रूझ, रेजीना कसान्ड्रा या कलाकारांना घेऊन हा सिनेमा साकारण्यात येणार होता. परंतु तरुण अग्रवाल आणि गौरांग दोषी यांच्यामध्ये अचानक वाद उद्भवल्यामुळे हा सीक्वेल रखडला होता. हा वाद न्यायालयापर्यंत गेला होता. या वादप्रकरणी तरुण अग्रवाल यांनी मौन बाळगले आहे. परंतु आँखे २ चे शूटींग पुढील वर्षी सुरु करण्यात येईल. असे तरुण यांनी म्हटले आहे.

 

लंडन आणि जॉर्जियामध्ये या सीक्वेलचे शूटींग हणार आहे. सिनेमाच्या कथेत कॅसीनोची गरज असल्याने जॉर्जिया येथील कॅसीनोचे आगाऊ बुकिंग करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले. अमिताभ बच्चन या सिनेमामध्ये महत्वाच्या भूमिकेत असतील. तसेच काही नव्या कलाकारांच्या आम्ही शोधात आहोत. सध्या काही कलाकारांशी आम्हा बोलणी सुरु केली आहेत.” असे तरुण अग्रवाल यांनी म्हटले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/