विवेकानंद प्रतिष्ठान सेमी विभागातील चिमुकल्यांचा आधुनिक भाजी बाजार !
महा एमटीबी   06-Dec-2018

जळगाव : 
 
येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथमिक शाळा वाघनगर येथे ‘सकस आहार प्रकल्पाअंतर्गत’ आधुनिक भाजी बाजार भरविण्यात आला. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सकस आहाराचे महत्त्व कळावे आणि गणितीयदृष्ट्या भाजीपाला खरेदी-विक्रीच्या हिशेबाचा अनुभव मिळावा हा यामागे उद्देश होता.
 
वाढत्या जंकफूड व फास्टफूडच्या सवयीपासून रोखणे व हिरव्या भाज्यांची आवड निर्माण होण्यासाठी विविध भाज्यांचे फायदे दर्शविणारे तक्ते विद्यार्थ्यांनी तयार करुन ग्राहकांना त्याबद्दल मार्गदर्शन केले.
 
उद्घाटन प्रकल्प विभाग प्रमुख आकाश शिंगाणे यांनी विद्यार्थ्यांच्या भाजी बाजारातील भाज्या विकत घेऊन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हेमराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील व समन्वयिका वैशाली पाटील होते. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक कुमुद कुरकुरे यांनी तर आभार प्रदर्शन आकाश शिंगाणे यांनी केले.
 
आयोजनासाठी श्रीराम लोखंडे, संजय आंबोदकर, गणेश वंडोळे, भाग्यश्री वारुडकर, पल्लवी पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संजय गायकवाड व सरला हातागळे यांनी परिश्रम घेतले.