विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडी. स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचे दिमाखात उद्घाटन
महा एमटीबी   06-Dec-2018

 
जळगाव : 
 
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे आयोजित 5 व 6 डिसेंबर दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्रमुख अतिथी म.न.पा. क्रीडा समन्वयक विवेक अळवणी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने आणि प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, सेमी विभागाचे मुख्याध्यापक हेमराज पाटील,विवेकानंद प्रतिष्ठानचे क्रीडा प्रमुख सूर्यकांत पाटील, माध्यमिक विभागाचे समन्वयक गणेश लोखंडे यांच्या उपस्थितीत बुधवारी झाले.
 
प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करतांना जीवनात खेळाला खूप महत्त्व असून शारीरिक, बौध्दीक क्षमता वाढण्याबरोरबच आरोग्यही चांगले राहते आणि मन उत्साही होते असे सांगितले.
 
या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, धावणे यासारख्या मैदानी स्पर्धा तसेच कॅरम व बुद्धिबळ यासारख्या बुद्धिला चालना देणा-या खेळांचाही समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
 
यावेळी राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू चैतन्य मांडे, लक्ष्मी भोळे, संजोग लहासे, पुलकेशी भोळे व मिलिंद चौधरी यांनी आणलेल्या मशालीने क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी खेळाप्रती निष्ठा जोपासण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
 
 
सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक मुकुंद शिरसाठ व नियोजन क्रीडा शिक्षकांनी केले. यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.