दिग्गजांच्या अभिनयाचा ‘सोहळा’
महा एमटीबी   06-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : दिग्दर्शक गजेंद्र आहिरे यांचा ‘सोहळा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. मोहन जोशी लोकेश गुप्ते आणि विक्रम गोखले या कलाकारांच्यादेखील ‘सोहळा’ या सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत.
 
 
 
 
नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा सिनेमा असून सचिन आणि शिल्पा यांचा मोडलेला संसार यात दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक गजेंद्र आहिरे आणि अभिनेता सचिन पिळगावकर हे ‘सोहळा’ या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करत आहेत. अभिनेता सचिन पिळगावकर यांनी या सिनेमात एक गाणेही गायले आहे. येत्या २१ डिसेंबर रोजी ‘सोहळा’ हा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/