सिंबाचे पहिले गाणे प्रदर्शित
महा एमटीबी   06-Dec-2018 

 

मुंबई : रोहित शेट्टी याचा ‘सिंबा’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. रणवीर सिंग, सारा अली खान, अजय देवगण, सिद्धार्थ जाधव असे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. नुकताच ‘सिंबा’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाचे ‘आंख मारे’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे.
 
 
 
 

अभिनेता अर्शद वारसी याच्या आंख मारे और लडकी आंख मारेया जुन्या गाण्याचे हे रिमिक्स व्हर्जन आहे. हे मूळ गाणे कुमार सानू यांनी गायले होते. आता मिक्का सिंग आणि नेहा कक्कड यांनी हे गाणे नव्या रुपात सादर केले आहे. या नव्या गाण्यात जुन्या गाण्यातील काही डान्स स्टेप्सही पाहायला मिळतात. या गाण्याला अवघ्या काही वेळातच हजारो व्ह्यूज मिळाले. करण जोहरची झलकही या गाण्यात पाहायला मिळते. येत्या २८ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/