उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचा साताऱ्यात राडा
महा एमटीबी   06-Dec-2018


 


सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या काही कार्यकर्त्यांनी 'फाईट' या मराठी चित्रपट निर्मात्याच्या गाडीची तोडफोड केली. "साता-यात फक्त मीच चालतो" असा हिरो बोलत असलेला डायलॉग काढुन टाकण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडली. या सगळ्या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 

साताऱ्यातील राधिका पॅलेसमध्ये 'फाईट' या मराठी चित्रपटाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी लावलेले पोस्टर फाडले व निर्मात्याच्या गाडीची तोडफोड केली. या चित्रपटाचा अभिनेता आणि दिग्दर्शक जिमी मोरे यांने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे हा चित्रपटासाठी पब्लिसिटी स्टंट असल्याचेही बोलले जात आहे. "हा चित्रपट उदयनराजेंच्या विरोधात नाही. उलट त्यांची आम्हाला साथ आहे. जे झाले ते चुकीचे झाले." अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या दिग्दर्शकाने व्यक्त केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/