भुसावळ मंडल तिकिट तपासणी कर्मचारीांची प्रशंसनीय कार्य
महा एमटीबी   06-Dec-2018

एकाच दिवसात साडेतेहतीस लाखांची विक्रमी वसुली!

भुसावळ, 6 डिसेंबर
भुसावळ मंडळ रेल्वे व्यवस्थापक आर. के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तिकिट तपासणी कर्मचार्‍यांनी एका दिवसात सर्वात जास्त उत्पन्न मिळविण्याचा विक्रम केला. आज गुरुवारी 6 डिसेंबर रोजी त्यांनी 5567 प्रकरणी 33 लाख 48 हजार 600 रुपयांची वसुली केली.
 
 
याआधीचा वसुलीचा विक्रम 18 ऑक्टोबर 2017 रोजी 33 लाख 9 हजार 980 रुपयांचा होता. नोव्हेंबर महिन्यादरम्यान दिवाळी व छटपुजेदरम्यान केलेल्या तपासणीत हा विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. अशा प्रकारे भुसावळ मंडळाचे कर्मचारी आपले काम अधिक मेहनतीने पूर्णपणे करीत रेल्वेच्या उत्पन्न वाढवीत आहेत. कर्मचार्‍यांच्या या प्रयत्नांमुळे नोव्हेंबर महिन्यातील तपासणीत रेल्वेला एकूण 4 कोटी 57 लाख रुपयांचा महसूल मिळालेला असून तो गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरातील उत्पन्नाच्या अडीच पटीपेक्षा अधिक आहे.
 
 
ही प्रशंसनीय कामगिरी तिकिट तपासणी कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रम व कार्याप्रती समर्पिततेमुळे होऊ शकली आहे.