कमल हसन ‘या’ सिनेमानंतर घेणार निवृत्ती
महा एमटीबी   06-Dec-2018

 


 
 
चेन्नई : अभिनेता कमल हसन हे लवकरच आपल्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीतून निवृत्ती घेत आहेत. ‘इंडियन ’ या सिनेमानंतर पुन्हा सिनेमात काम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन कमल हसन यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राजकारणासाठी वेळ देता यावा या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
 

‘इंडियन हा माझ्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीचा शेवटचा सिनेमा असेल. असे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन’ या सिनेमाचा हा सिक्वेल असणार आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कमल हसन यांनी राजकारणात प्रवेश केला. मकक्ल निधी मय्यम या पक्षाची त्यांनी स्थापना केली. निवडणुक लढविण्याची त्यांनी तयारी केली आहे.

 

मी आजवर प्रेक्षकांच्या मनात राहत होतो. आता मात्र मला राजकारणाच्या माध्यमातून तामिळनाडूच्या घराघरात पोहोचायचे आहे. मला जनतेत राहायचे आहे. राजकारणात जनसेवा करण्यालाच मी प्राधान्य देईन.” असे कमल हसन यांनी म्हटले. लवकरच ‘इंडियन या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. अभिनेत्री काजल अगरवाल या सिनेमात कमल हसन यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘२.०’ या सिनेमाचे दिग्दर्शक शंकर ‘इंडियन या सिनेमाचे दिग्दर्शन करतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/