भारतीय 'शेर' झाले ऑस्ट्रेलियात 'ढेर'
महा एमटीबी   06-Dec-2018भारताच्या पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा

 

ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज पहिल्या कसोटीला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यापुढे चेतेश्वर पुजारा सोडता अन्य खेळाडूंनी अक्षरशः नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. चेतेश्वर पुजाराच्या शतकाच्या बळावर भारताने पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावांपर्यंत मजल मारली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर टॅग धरून दिला नाही.

 

भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक १२३ धावांची खेळी केली. तर रोहित शर्मा व ऋषभ पंत फटकेबाजी करण्याच्या नादात झटपट बाद झाले. या दोघांनी अनुक्रमे ३७ व २५ धावा करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठी खेळी करण्यात दोघेही अपयशी झाले. भारतीय खेळाडू मैदानात नांगी टाकून जात असता पुजारा एकीकडे भारताची बाजू भक्कमपणे लढवत होता. रोहित व पंत बाद झाल्यानंतर त्याने अश्विनला सोबतीला घेऊन काही खिंड लढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अश्विन देखील अवघ्या २५ धावा करून माघारी परतला. सावध गतीने धावा करणाऱ्या पुजाराने आपले शकत पूर्ण करत भारताच्या धावा हलत्या ठेवल्या. पण धावा चोरण्याचा प्रयत्नात पुजाराच धावबाद झाला. यानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. दिवसाखेर भारताने ९ बाद २५० धावांपर्यंत मजल मारली होती.

 

पुजाराच्या पाच हजार धावा

 

पहिल्या कसोटीमध्ये भारतीय डावाची पडझड होत असताना, पुजाराने एकट्याने खिंड लढवत आपले दिमाखदार शतक पूर्ण केले. सोबतच त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५ हजार धावांचा टप्पादेखील पूर्ण केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/