अर्थव्यवस्था गतिमान : नागपूर जगात पाचवे
महा एमटीबी   06-Dec-2018
 

नवी दिल्ली : जगात सर्वाधिक गतिमान विकास करणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताने स्थान मिळवले आहे. ऑक्सफर्ड इकॉनोमिक्सच्या जागतिक संशोधन अहवालानुसार, भारत २०१९ ते २०३५ या वर्षापर्यंत झपाट्याने विकास करेल. दरम्यान, या अहवालानुसार, सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये सुरतचा सामावेश आहे. या शहराचा वार्षिक विकास ९.१७ टक्के असेल, अंदाज व्यक्त केला जात आहे तर आग्रा शहर ८.५८ टक्क्यांच्या वाढीसह दुसऱ्या आणि बंगळुरू ८.५० टक्क्यांच्या वृद्धीदरासह तिसऱ्या स्थानी आहे.

 

सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये पहिली दहा शहरे भारतातीलच आहेत. महाराष्ट्रातील नागपूर यात ८.४१ टक्क्यांच्या वृद्धीसह पाचव्या स्थानावर आहे. आशियातील शहरांचा एकत्रित जीडीपी २०२७पर्यंत युरोपीय शहरांपेक्षा जास्त असणार असल्याचे संशोधनात व्यक्त केले आहे. आशियातील प्रमुख शहरे ही २०३५पर्यंत सर्व शहरांपेक्षा पुढे जातील, असेही यात सांगितले आहे. दरम्यान २०३५पर्यंत न्युयॉर्क, टोकयो, लॉस एंजिलिस, लंडन, शांघाई, बिजिंग, पॅरिस, शिकागो आदी शहरे मोठी शहरे म्हणून ओळखली जातील, असेही या अहवालात नमूद केले आहे.

 
 

शहर 

सूरत

 वृद्धीदर (टक्क्यांत)

.१७

आग्रा

.५८

बंगळुरु

.

हैदराबाद

.४७

नागपुर

.४१

त्रिपुर

.३६

राजकोट

.३३

तिरुचिरापल्ली

.२९

चेन्नई

.१७

विजयवाड़ा

.१६ 

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/