‘भाई: व्यक्ती की वल्ली’ चा दुसरा टीझर प्रदर्शित
महा एमटीबी   06-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाचा दुसरा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या दुसऱ्या टीझरमध्ये पु.ल देशपांडे यांच्या बालपणीपासून ते तरुणपणीचा काळ दाखविण्यात आला आहे.
 
 
 
 

 

शालेय जीवनातील पु.ल देशपांडे यांची व्यक्तिरेखा अभिनेता सक्षम कुलकर्णी याने साकारली आहे. अभिनेता सागर देशमुख हे प्रेक्षकांना तरुणपणीच्या पु.ल देशपांडेंच्या भूमिकेत दिसतील. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ या सिनेमामुळे पु.ल देशपांडे या महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळणार आहे. पुढील वर्षी ४ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/