अनिकेत विश्वासराव साकारतोय वेबसीरिज
महा एमटीबी   06-Dec-2018
 
 
 

मुंबई : अभिनेता अनिकेत विश्वासराव लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पॅडेड की पुशअप’ असे या वेब सीरिजचे नाव आहे. हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफे मराठीने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. हंगामा प्लेवर ही वेबसीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या वेबसीरिजमध्ये अनिकेत एका आगळ्या वेगळ्या विनोदी भूमिकेत दिसणार आहे.

 

किशोरी आंबिये, तेजश्री प्रधान आणि सक्षम कुलकर्णी हे कलाकार अनिकेत सोबत या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसतील. आकाश गुरसाळे यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. सध्या सगळीकडे वेबसीरिजचाच बोलबाला आहे. वेब सीरिजना मिळत असलेल्या प्रेक्षाकांच्या उदंड प्रतिसादामुळे अनेक कलाकारांनी आपला मोर्चा वेबसीरिजकडे वळवला आहे. अभिनेता अनिकेत विश्वासरावने देखील काम करण्यासाठी आता या डिजीटल माध्यामाला पसंती दिली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/