ठाण्यामध्ये 'अग्निकल्लोळ' ; ९ दुचाकी जाळल्या
महा एमटीबी   06-Dec-2018


 


ठाणे : ठाण्यामधील पाचपाखाडी भागात गुरुवारी पहाटे काही अज्ञात इसमांनी ९ दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने कारवाई करत आग आटोक्यात आणली. या प्रकारामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. आग कोणी आणि का लावली याची माहिती अजून मिळाली नसून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास ही आग लावली गेली. कौशल्या हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटरसायकलींना अज्ञातांनी लक्ष्य केले. आगीत सर्वच गाड्यांचे प्रचंड नुकसान झालं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ठाणे तसेच भिवंडीमध्ये गाड्या जाळण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या बाबतीत गंभीर कारवाई करावी अशी मागणी रहिवासी करत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/