पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर
महा एमटीबी   05-Dec-2018अॅडलेड : उद्यापासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. अॅडलेड दोन्ही संघादरम्यान पहिला सामना खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून दिली. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियानेदेखील आपला संघ जाहीर केला आहे.

 

गेल्या ११ महिन्यांपासून कसोटी क्रिकेटपासून लांब राहिलेल्या रोहित शर्माला अखेर कसोटी संघात स्थान मिळाले. तर भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि रवींद्र जडेजाला पहिल्या कसोटीला मुकावे लागणार आहे. अॅडलेडच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन भारत या कसोटीत चार गोलंदाजांसह उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-२० मालिका बरोबरीत सोडल्याने आता भारतीय संघ कसोटी सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे भारतीय प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

 

भारतीय संघ

 

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), आर. अश्विन, मो. शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह

 

ऑस्ट्रेलिया संघ

 

मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँडस्कॉम्ब, ट्रॅविस हेड, टिम पेन (कर्णधार), पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, नाथन लियोन, जोश हेजलवूड

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/