स्थिर व्याजदरांमुळे शेअर बाजारात घसरण
महा एमटीबी   05-Dec-2018

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा बैठकीचा फटका बुधवारी शेअर बाजारावर बसला. व्याजदरांमध्ये कोणताही बदल न झाल्याने बुधवारी शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २४९.९० अंशांच्या घसरणीसह ३५ हजार ८८४.४१च्या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८६.६० अंशांच्या घसरणीसह १० हजार ७८२.९० वर बंद झाला. सलग तिसऱ्या दिवशी सनफार्माच्या शेअरची घसरण सुरूच होती, निफ्टीच्या मंचावर सर्वाधिक घसरणीसह तो २५ अंशांनी घसरुन ४१७.२० रुपयांवर बंद झाला.

 

पदधोरण आढावा बैठकीत व्याजदर स्थिर राहील्याने मेटल, ऑटो आणि फार्मा इंडेक्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी मेटल इन्डेक्स ३.६८ टक्के, निफ्टी फार्मा २.५४ टक्के आणि निफ्टी एफएमसीजीमध्ये ०.५८ टक्के घसरण झाली. दरम्यान दिवसभराच्या सत्रात एचयुएल, एचडीएफी, विप्रो, रिलायन्स, एचडीएफसी बॅंक, अदानी पोर्टस आदी शेअर वधारले. टीसीएस, एशियन पेटंस्, बजाज ऑटो, इन्फोसिस, हीरो मोटोकॉर्पमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/