२०१९साठी कालनिर्णयच्या आवृत्त्या प्रकशित
महा एमटीबी   05-Dec-2018मुंबई : ४५ वर्ष ऐतिहासिक वारसा असलेला आणि मराठी माणसांवर सांस्कृतिक ठसा उमटवणारी दिनदर्शिका म्हणजेच 'कालनिर्णय'. दरवर्षीप्रमाणे कालनिर्णयने २०१९साठी आपल्या आवृत्त्या प्रकशित केल्या आहेत. कालनिर्णय हे सुमंगल प्रकाशनाद्वारे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तमिळ आणि तेलुगू या सात भाषांमध्ये दरवर्षी प्रकाशित होत असते. जवळपास एक कोटीहून अधिक ग्राहकांवर कालनिर्णयने आपली पकड मजबूत केली आहे.

 

समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून, ठराविक ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार स्वादिष्ट, आरोग्य, मोठे व छोटे ऑफिस, मीडिअम, कार, डेस्क, मिनी, मायक्रो, वर्षचंद्रिका, विकली नोट प्लॅनर, पॉकेट डायरी, इयर प्लॅनर अशा विविध प्रकारांतील आवृत्त्या प्रकाशित करत असते. तसेच देशातील पहिली वेबसाईट, अॅप अशा उपक्रमांद्वारे 'कालनिर्णय' नेहमीच काळाबरोबर चालत आले आहे.

 

पंचांग, भविष्य, सणवार, तिथी-नक्षत्रे, शास्त्रार्थ ही दिनदर्शिकेतील प्रमुख अंगे असतात. विशेष म्हणजे जनसामान्यांसाठी सोपे व सुलभ पंचांग सुरु करण्याचा पायंडा 'कालनिर्णय'ने पंचेचाळीस वर्षांपूर्वीच घातला होता. आणि आजतागायत कालनिर्णय तो पळत आला आहे. म्हणूनच 'ऑडिट ब्युरो ऑफ सर्म्युलेशन' (ABC*) या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील सर्वाधिक खपाचे प्रकाशन म्हणून कालनिर्णयचा सन्मानदेखील केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/