इराकमध्येही प्रेक्षक पाहतात ‘ही’ मालिका
महा एमटीबी   05-Dec-2018 
 
 
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील तुला पाहतो रे ही मालिका सध्या खूप गाजतेय. महाराष्ट्रातील घराघरात तर ही मालिका पाहिले जातेच, पण इराकमधील प्रेक्षकही ही मालिका आवर्जून पाहतात. आज ‘तुला पाहते रे’ या मालिकेचा शंभरावा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त या मालिकेचा नायक विक्रांत सरंजामे अर्थात अभिनेता सुबोध भावे यांनी नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
 
 
 
 

या व्हिडिओमध्ये तुला पाहते रे च्या संपूर्ण टीमला आणि सुबोध भावे यांना मालिकेच्या शंभराव्या एपिसोडसाठी शुभेच्छा देत आहे. भारताबाहेर परदेशातील नागरिकांनाही ही मालिका पाहायला आवडते. हे यावरून दिसून येते. मालिकेला परदेशातूनही रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या या उदंड प्रतिसादाबद्दल सुबोध भावे यांनी आनंद व्यक्त केला. तसेच सर्व इराकी लोकांना नमस्कार आणि खूप सारे प्रेम असे सुबोध यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/