चीनमध्ये प्रदर्शित होणार '२.०’
महा एमटीबी   05-Dec-2018 
 
मुंबई : रजनीकांत आणि अक्षयकुमार यांचा २.० हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. २.० या सिनेमाने आतापर्यंत ४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुढील वर्षी चीनच्या १० हजार सिनेमागृहांमध्ये २.० हा सिनेमा दाखवला जाणार आहे. चीनमध्ये ५६ हजार स्क्रीनवर हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे. यापैकी ४७ हजार स्क्रीनवर 3D मध्ये हा सिनेमा पाहता येणार आहे. एखाद्या देशाने एक परदेशी सिनेमा इतक्या मोठ्या प्रमाणावर 3D स्वरुपात उपल्बध करून देण्याचे आजवरच्या सिनेसृष्टीच्या इतिहासात प्रथमच घडले आहे.
 
 
 
 

२.० हा भारतातील सर्वात बिग बजेट सिनेमा आहे. वीएफएक्स इफेक्ट्सने हा सिनेमा उत्कृष्टरित्या साकारण्यात आला आहे. सामाजिक संदेशही या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना देण्यात आला आहे. आता चीनमध्ये या सिनेमाला कसा आणि किती प्रतिसाद मिळतोय? हे पाहण्याजोगे असेल. अभिनेता आमिर खानचा ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ हा सिनेमा या डिसेंबरमध्ये चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. अभिनेता आमिर खान हा चीनसाठी ओळखीचा चेहरा आहे. यापूर्वी आमीरच्या ‘दंगल’ या सिनेमाने चीनमध्ये चांगली कमाई केली होती. त्यामुळे पुढील वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणारा ‘२.०’ हा सिनेमा चीनमध्ये काय जादू दाखवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/