‘माऊली’चे हे नवे गाणे पाहिले का?
महा एमटीबी   04-Dec-2018

 


 
 
मुंबई : अभिनेता रितेश देशमुखचा ‘माऊली’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. ‘माऊली’ या सिनेमाचे एक नवे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘धवून टाक’ असे या गाण्याचे नाव आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख या जोडीवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.
 
 
 
 

यापूर्वी ‘लय भारी’ या सिनेमातदेखील होळीचे एक गाणे होते. त्या गाण्यातही जेनेलियाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. अजय-अतुल यांचा आवाज या गाण्याला लाभला आहे. चार वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा या गाण्याच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुखने हे गाणे ट्विटरवर शेअर केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/