दीपिका झाली फोटोग्राफर्सची ‘वहिनी’
महा एमटीबी   04-Dec-2018

 


 
 
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा लग्नसोहळा इटलीत पार पडला. लग्नानंतर रणवीर दीपिकाने बेंगळुरु आणि मुंबईत रिसेप्शन ठेवले होते. या जोडीच्या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
 
 
 
 

या रिसेप्शन सोहळ्याला पत्राकार आणि फोटोग्राफर्सना खास आमंत्रण होते. रणवीर-दीपिकाने पत्रकार आणि फोटग्राफर्ससह फोटोही काढला. या दरम्यान दीपिका पत्रकारांशी हात मिळवत असताना तिला काही जणांनी भाभीजी अशी हाक मारली. त्यावर नाराज न होता. दीपिकाने स्मित हास्य करत ‘मला भाभीजी म्हणू नका’ अशी विनंती केली. तर यावर शक्कल लढवत काही फोटोग्राफर्स दीपिकाला मराठीत ‘वहिनी’ म्हणून हाक मारू लागले. हे ऐकून दीपिका हसायला लागली. फोटोग्राफर्सच्या या धमालमस्तीचा व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळते.

 
 

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/